BACK

Home / Gallery  / 

मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बसपासचे वाटप

मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बसपासचे वाटप


मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बसपासचे वाटप मंगळवार , दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ५.00 वाजता महापौर निवास, शिवाजी पार्क,दादर येथे मुंबईचे महापौर माननीय श्री विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सर्वश्री अजय चौधरी, रमेश कोरगांवकर, अध्यक्ष, स्थापत्य समिती, अनिल कोकीळ, अध्यक्ष, बेस्ट समिती, यशवंत जाधव, सभागृह नेता, मिलिंद वैद्य, अध्यक्ष, जी/ उत्तर प्रभाग समिती, राजेश कुसळे, सदस्य, बेस्ट समिती, आशिष चेंबूरकर, नगरसेवक, सचिन पडवळ, नगरसेवक, सर्वश्रीमती हेमांगी वरळीकर, उप महापौर, शुभदा गुडेकर, अध्यक्षा, शिक्षण समिती, विशाखा राऊत, अध्यक्षा, स्थापत्य समिती (शहर), रोहिणी कांबळे, अध्यक्षा, सार्वजनिक आरोग्य समिती, सिंधू मसुरकर, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती, श्रद्धा जाधव, माजी महापौर, रत्ना महाले, सदस्य, बेस्ट समिती, डॉ सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट, श्री ए. एल. जऱ्हाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर), मिलिन सावंत, उप आयुक्त (शिक्षण) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.