BACK

Home / Gallery  /  बस प्रवर्तन

बस प्रवर्तन


मुंबई उपनगराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरा बस प्रवर्तन

बेस्ट समिती अध्यक्ष माननीय श्री मोहन मिठबावकर यांच्याकडे प्रवासी जनतेकडून होणाऱ्या सततच्या मागणीचा विचार करून बेस्ट उपक्रमाने १ डिसेंबर २०१६ पासून दादर रेल्वे स्थानक पूर्वेपासून मुंबई उपनगराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरा बस प्रवर्तन करण्याचा निर्णय घेतला. सदर मोहिमेचा शुभारंभ बेस्ट समिती अध्यक्ष माननीय श्री मोहन मिठबावकर यांच्या शुभहस्ते १ डिसेंबर २०१६ रोजी दादर रेल्वे स्थानक पूर्व येथे पार पडला.

बस मार्ग क्र. २०२ (मर्यादित) चे उदघाटन १ डिसेंबर २०१६ रोजी रात्रौ १. ४५ वाजता करण्यात आले. सदर बसमार्ग दादर रेल्वे स्थानक पूर्व ते गोराई आगार असा कार्यान्वित होईल.

याशिवाय बस मार्ग क्र. ४ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार- रात्रौ २. २५ रात्रौ २. २५ वाजता , बस मार्ग क्र. ३०२ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते मुलूंड स्थानक पश्चिम- रात्रौ २. ३० वाजता, बस मार्ग क्र. ५२१ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते कोपरखैराणे- पहाटे ४. ०० वाजता याप्रमाणे हे अन्य बसमार्ग प्रवर्तित करण्यात येतील.


Contact us Need Help?

Your email address will not be published.

Required fields are marked *

Your email address will not be published.

Required fields are marked *