BACK

Home / Gallery  / 

इयत्ता १२ च्या परिक्षेमध्ये विशेष गुण प्राप्त केलेल्या विध्यार्थ्याचा बेस्ट समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार

इयत्ता १२ च्या परिक्षेमध्ये विशेष गुण प्राप्त केलेल्या विध्यार्थ्याचा बेस्ट समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार


दरवर्षी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उपक्रमातील अधिकारी / कर्मचाऱयांच्या मुलांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केल्यास बेस्ट समिती अध्यक्ष प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करतात.

या वर्षी फेब्रुवारी/ मार्च २०१८ मध्ये पार पडलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी श्री देवेंद्र प्रभाकर ढालकर ,वरिष्ठ बसचालक ,गोरेगाव आगार यांच्या मुलगा कुमार पारिजात देवेंद्र ढालकर याने ९६.२२ टक्के गुण प्राप्त केल्यामुळे बेस्ट समिती अध्यक्ष मान. श्री आशिष चेंबूरकर यांनी दिनांक ०६ जून २०१८ रोजी त्यांच्या राहते घरी विलेपार्ले येथे प्रत्यक्ष जाऊन कुमार पारिजात याचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कुमार पारिजात व त्याचे आई वडील उपस्थित होते .