BACK

Home / Gallery  / 

बेस्ट उपक्रमात मराठी भाषा गौरव दिन संपन्न.

बेस्ट उपक्रमात मराठी भाषा गौरव दिन संपन्न.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी कॉन्फरन्स हॉल , कुलाबा मुख्यालय , मुंबई येथे बेस्ट उपक्रमातील लेखक व कवींचा कथा व काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . मान . बेस्ट समिती अध्यक्ष श्री . अनिल पाटणकर यांच्या हस्ते सरस्वती देवीस पुष्पहार अर्पण करून व समई प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी बेस्ट समितीचे मान . सदस्य सर्वश्री आशिष चेंबुरकर , सुनिल गणाचार्य व राम सावंत तसेच बेस्ट उपक्रमाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री . राजेंद्र मदने उपस्थित होते.

बेस्ट उपक्रमाच्या वतीने प्रथमच मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वश्री मनोज वराडे , सत्यवान इथापे , संतोष खैरे , समीर कुलकर्णी , राजेंद्र ढवळे , शरद जगधणे , बाळू भालेराव , मंगेश रेडीज या कवींनी व सर्वश्रीमती मृणाल ठाकुरदेसाई , आसिफा पटेल , सूचित्रा परब या कवियत्रींनी आपल्या कविता सादर केल्या . तसेच श्री. योगेश शिंदे व चंद्रकांत पाटील ( लोंढे ) या कथालेखकांनी आपल्या कथा सादर केल्या .

बेस्ट उपक्रमातीलअधिकारी- कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.