BACK

Home / Gallery  / 

बेस्ट उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

बेस्ट उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
प्रति
संपादक / वृत्त संपादक

आज बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक अंतर राखून मास्क पर धान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्ट भवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास माननीय श्री. आशिष रामनाथ चेंबूरकर , अध्यक्ष, बेस्ट समिती यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमास बेस्ट उपक्रमाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (विधी), तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

वरील वृत्त स आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्धि द्यावी ही विनंती.
( सत्यवान इथापे )
उप जनता संपर्क अधिकारी करिता
बेस्ट उपक्रम