विद्युत कायदा २००३ मधील कलमांअंतर्गत विजचोरी हा अजामीनपात्र अपराध आहे. विज चोरीमुळे फक्त बेस्ट उपक्रमाचेच नुकसान नव्हे तर पुर्ण समाज व पर्यायाने देशाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विज चोरीमुळे प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा अतिरिक्त भर पडतो. विजचोरीमुळे होणार्या विद्युत अपघातांमुळे आग लागणे, स्फोट होणे अशा गंभीर घटना घडून आर्थिक नुकसान तर होतेच परंतू क्वचित प्रसंगी सामान्य नागरिकांना गंभीर इजा किंवा मृत्यू होण्याचा धोका देखील संभवतो.
विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत वीजचोरी साठी गुन्हा सिद्ध झाल्यास एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा अथवा अपराध्याला दंड किंवा दोन्ही सजा एकदम भोगाव्या लागू शकतात. ज्या व्यक्ति अप्रामाणिकपणे आणी जाणीवपूर्वक खाली नमूद केलेली कृत्ये करतात त्याला विजचोरी असे संबोधले जाते :-
- विना मीटर थेट विद्युत जोडणी करणे.
- विद्युत मिटरमध्ये फेरफार/ बिघाड करणे, लूप जोडणी करणे किंवा विद्युत मिटर मधे नोंद होणार्याध वीज एककाच्या अचूकतेमध्ये फेरफार करणारे यंत्र बसवणे.
- वीज मिटर नादुरुस्त करणे/ वीज मिटरमधिल यंत्रणा व वायर्समध्ये फेरफार करणे जेणेकरुन मिटर मधे नोंद होणार्याए वीज एककाच्या अचूकतेमध्ये बदल होईल.
- फेरफार केलेल्या मिटरमधून विद्युत जोडणी वापरणे.
- ज्या कारणासाठी वीज जोडणी घेतलीय ती वगळून दुसर्याम कारणासाठी वीज जोडणी वापरणे.
कृपया, आपली ओळख गोपनीय राहील तसेच आपली माहिती कोणालाही दिली जाणार नाही याबद्दल आश्वस्त रहा. बेस्ट उपक्रमाला आपण दिलेल्या माहितीमुळे घातलेल्या धाडीत विजचोरी पकडण्यात यश आल्यास, माहिती देणा-या व्यक्तिला त्वरित बक्षीस म्हणून प्रोविजनल क्लेमच्या १% (परंतु जास्तीत जास्त ५,०००/-) इतकी रक्कम वितरित केली जाईल. तदनंतर अंतिम दावा निर्धारित होऊन सदरची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून वसूल होऊन विजचोरी केस दफ्तरी दाखल (बंद) झाल्यावर प्रशासकीय आदेश मध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती देणा-या व्यक्तिला अंतिम दावा रक्कमेच्या ५% (परंतु जास्तीत जास्त ५०,०००/-) इतकी रक्कम वितरित केली जाईल.
Enquire Now