1994 मधील भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी डॉ.सोनिया सेठी यांनी अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास केला असून ऑक्सफर्ड विद्यापिठामधून मेजर प्रोग्रॅम मॅनेजमेंट या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. तसेच, त्यांनी पायाभूत सुविधा वित्त पुरवठा यामध्ये डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी सागरी किना-यामधील सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी म्हणून सेवा केली असून सिडको, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महत्वाच्या पदांवर कार्य केले आहे. त्यांनी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन, वित्त पुरवठा आणि अंमलबजावणी समजून घेण्याकरिता पायाभूत सुविधा क्षेत्रातील व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आहे.
डॉ. सोनिया सेठी या महाराष्ट्र राज्यातील वाहतूक आयुक्त पद भूषविणा-या पहिल्या महिला अधिकारी होत्या. त्यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये त्याचप्रमाणे वाणिज्य मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे.
त्यांनी साध्य केलेल्या मुख्य व्यावसायिक कामगिरी मध्ये 2010 या वर्षामधील प्रति॑ष्ठित आठ पदरी वांद्रे वरळी सागरी किनारा मार्ग याचा समावेश असून त्यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण या संस्थेच्या प्रमुखपदी असताना 314 किलोमीटर लांबीच्या मुंबई मेट्रो जालव्यूहाचा भाग म्हणून अंधेरी, डी.एन. नगर आणि दहिसर या स्थानकांना जोडणा-या 20 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग कार्यान्वित केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग-2 च्या प्रधान सचिव म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या 408 शहरी नागरी संस्थांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम केले असून संस्थात्मक क्षमता वाढविण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रगत विकासासाठी
संस्थात्मक मूळ घडण मजबूत करण्याकरिता नाविन्यपूर्ण आणि एकत्रित दृष्टीकोन याबाबत काम केले आहे. त्यांनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक खाजगी भागिदारीचे धोरण देखील तयार केले आहे.
अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) पदी असताना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या राज्यस्तरीय प्रभावी अंमलबजावणीबाबत खातरजमा केली असून त्यामध्ये धोरण आणि योजना राबविणे, राज्य आपत्कालिन संचालन केंद्र, जिल्हा आपत्कालिन संचालन केंद्रांचे आधुनिकीकरण आणि राज्यामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्थेची उभारणी करणे अशी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्याकरिता आपत्ती निवारण पायाभूत सुविधा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी केली आहे.
डॉ. सेठी यांना परिवहन क्षेत्रामध्ये आणि नागरी गती॑शील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन यामध्ये व्यापक स्वरुपात अनुभव आहे. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार तसेच, पायाभूत सुविधेमधील वित्त पुरवठा त्यामधील त्यांचा व्यावसायिक अनुभव असल्यामुळे त्यांना बेस्ट उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता आणण्याकरिता आणि क्षमता उत्पादन वाढविण्याकरिता सदर अनुभव उपयुक्त होईल.
श्री सुरेश पालजी मकवाना हे २२ जुलै १९९२ रोजी बेस्ट उपक्रमात प्रोबेशनरी अभियंता म्हणून रुजू झाले. त्यांनी १९९१ मध्ये सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई, येथून बी.ई. (इलेक्ट्रिकल) तसेच फायनान्समध्ये एमबीए केले आहे.
३४ वर्षांच्या समृद्ध अनुभवासह, २०१२ मध्ये मुख्य अभियंता झाल्यापासून त्यांनी परिरक्षण व कार्य, ग्राहक सेवा आणि नियोजन या विभागांमध्ये प्रमुख नेतृत्व पदांवर काम केले आहे. तंत्रज्ञानाची आवड आणि उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी असणारी त्यांची ओळख, यामुळे त्यांची भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेसाठी (RDSS) नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि बेस्टमध्ये या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई विद्युत पुरवठा शाखा एका शतकाहून जुन्या युटिलिटीमधून तंत्रज्ञान- आधारीत, ग्राहक-केंद्रित वीज वितरण कंपनीमध्ये (DISCOM) रूपांतरित होत आहे. प्रमुख उपक्रमांमध्ये स्मार्ट मीटरिंग, प्रगत SCADA प्रणाली आणि ऊर्जा लेखापरीक्षण उपाययोजना यांचा समावेश आहे. त्यांच्या योगदानामुळे 'बेस्ट'ला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि मान्यता मिळण्यास मदत झाली आहे.
सखोल तांत्रिक ज्ञान आणि सक्षम व्यवस्थापन कौशल्याच्या संयोगामुळे दक्षिण मुंबईतील सुमारे १०.८ लाख ग्राहकांना विश्वसनीय, अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.